पुसेगावात रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भरतशेठ मुळे यांचा सकारात्मक पुढाकार
बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
सातारा–पंढरपूर महामार्गावरील पुसेगावमधील रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. भरतशेठ मुळे यांनी आपली इमारत स्वखर्चाने हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे पुसेगावातील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.
सातारा–पंढरपूर रस्त्यावरील पुसेगाव हे महत्त्वाचे धार्मिक आणि व्यापारी केंद्र आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेसह वर्षभर या मार्गावर भाविक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, गावातील रखडलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असून नागरिकांनाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी संबंधितांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. देवस्थान ट्रस्टच्या विनंतीचा मान राखत भरतशेठ मुळे यांनी स्वतःहून पुढाकार घेत इमारत हटविण्याचे काम सुरू केले आहे.
वैयक्तिक हितापेक्षा गावाचा विकास आणि सार्वजनिक हिताला प्राधान्य देत त्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या सहकार्यामुळे इतर संबंधितांनाही सकारात्मक प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुसेगावातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, संबंधित यंत्रणेनेही विलंब न करता पुढील कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





Social Plugin