बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने यावर्षी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वडूथचे मुख्याध्यापक तथा विभागीय अधिकारी मध्य विभाग सातारा , व बुधचे सुपुत्र श्री नवनाथ जगदाळे यांना आदर्श मुख्याध्यापक या पुरस्काराने गौरवले. श्री नवनाथ जगदाळे यांनी आतापर्यंतचे सेवेत आपल्या प्रत्येक शाखेच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेतले . त्याचेच हे फलित आहे या त्यांच्या यशाचे कौतुक रयत शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले .. त्यात संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी , व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉक्टर अनिल पाटील, विभागीय चेअरमन संजीव पाटील ,सचिव किशोर राजे निंबाळकर , सहसचिव डॉ शिवलिंग मेनकुदळे , माध्यमिकचे सहसचिव श्री बी एन पवार , सहाय्यक विभागीय अधिकारी श्री निकम सर व दाभाडे सर या सर्व मान्यवरांनी सरांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे खूप खूप अभिनंदन केले. तसेच इंग्लिश स्कूल वडूथ च्या स्कूल कमिटीने ही सरांचे अभिनंदन आणि कौतुक केले शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थ्यांनी सरांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक केले असाच सरांच्या यशाचा आलेख वाढत जावा त्यांना यश प्राप्त होवो ही सदिच्छा शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री दिघे सरांनी व्यक्त केली.





Social Plugin