प्रतिनिधी=रोशन ओलोकार
आ. केवळराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांचा आढावा
धारणी : शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आ. केवलराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली धारणी येथे तालुका समन्वय समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी कावडे तसेच जलसंधारण विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा, विकास योजनांच्या अंमलबजावणीचा तसेच ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील विकासकामांना गती देणे, शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय राखून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे, या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.





Social Plugin