प्रतिनिधी दीपक गुरव
चाळीसगांव - जळगाव जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणारे इसमांविरुध्द मुं.पो.का.क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव यांचे कडे आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडून चौकशी करुन ते खरोखर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे किंवा वारंवार गुन्हे करण्याचे सवयी आहे असे चौकशीअंती निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत आहे.
चाळीसगांव शहर पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०२/२०२३ प्रमाणे (१) जगदीश जगन्नाथ महाजन वय ५१ रा. नेताजी पालकर चौक चाळीसगांव टोळी प्रमुख, (२) दादु उर्फ विशाल जगदीश महाजन वय २३ रा. नेताजी पालकर चौक चाळीसगांव टोळी सदस्य, यांच्याविरुध्द जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन मध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, सरकारी नोकरी हल्ला, घातक हत्यार बाळगणे गुंगीकारक अंमली पदार्थ, दंगल करणे असे एकुण १० गुन्हे दाखल आहेत. सदर सामनेवाले यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव यांनी केलेली आहे.
सदर सामनेवाले यांनी टोळीने राहुन जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन परीसरात ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्ह्यातील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखिल त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. सदरचा हद्दपार प्रस्ताव हा चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, विनोद भोई, तुकाराम चव्हाण, महेद्र पाटील, यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडे सादर केलेला होता. यांचे कडे सादर केलेला होता.
डॉ महेश्वर रेडडी, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी प्रस्तावाचे चौकशी अंती सामनेवाले यांना ०६ महिन्या करीता जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित करण्यात आले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पो.निरीक्षक. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.





Social Plugin