प्रतिनिधि : कृष्णा महाले बदलापूर
संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या उल्हास नदीला यावर्षी पुन्हा एकदा जलपर्णीने विळखा घातलाय.बदलापुरातील वालीवली गावाजवळ असलेल्या उल्हासनदीवरील पुलावरून नदीचं रूप पाहिल्यास सर्वत्र पाण्यावर जलपर्णीची हिरवी चादर पसरल्यासारखं दृश्य दिसून येतंय. या जलपर्णीमुळे नदीतील पाण्यातला ऑक्सिजन कमी होऊन, जलचरांना खाद्य न मिळाल्यास नदीतील जलचर प्राणी नष्ठ होण्याची भीती असते.
यापूर्वी अनेक पर्यावरणवादी संस्थांनी उल्हासनदी बचाव अभियानातून उल्हासनदी स्वछ करण्यासाठी अनेक मोहीम राबवल्या. उल्हासनदीवर जलपर्णीच विळखा वाढल्याने प्रशासन आणि पर्यावरणवादी संस्थांनी पुढाकार घेऊन उल्हासनदीवर वाढत चाललेल्या जलपर्णीला नष्ठ करून उल्हासनदीला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्याची गरज व्यक्त होऊ लागलीये.





Social Plugin