Ticker

6/recent/ticker-posts

सोनापीर दर्गा माहुर येथे कव्वाली मुकाबला



ता.प्रतिनिधि निलेश जाधव

माहुर:- तीर्थक्षेत्र माहुर ला संताची भूमी म्हणून ही ओळखलेजाते,याच माहुर शहरात हिंदू मुस्लिमएकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सनाउल्लाह शहा उर्फ सोनापीर बाबा यांची पुरातन दर्गाह आहे.या ठिकाणी दर वर्षी ५ ते १० मार्चला उरूस साजरा केला. जातो मागील ५५ वषार्ची परंपराअसलेल्या या यात्रा उरूस महोत्सवाला मंगळवार दिनांक ५ पासून शाही संदल ने सुरुवात होणार असल्याने सोनापीर बाबाचा उरूस यात्रेची पंचक्रोशीत नागरिकात विशेष आवड असते.या उरूस मध्ये आंध्र, तेलंगानासह राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिक हजेरी लावतात.यंदा दिनांक ६ मार्च रोजी नसीम जानी कव्वाल (नागपुर) यांचातर ७ मार्च  रोजी सलीम जावेद कव्वाल मुंबई यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे.दिनाक ९ मार्च रोजी कीर्तनकार सप्त खंजरी वादक तुषार सुर्यवंशी यांचा समाजप्रबोधन चा कार्यक्रम होणार आहे.दिनाक.१० मार्च रोजी इंटरनॅशनल ख्याती चे फेम टिव्ही  सिंगर मुराद आतिश यांचा कव्वाली चा कार्यक्रम होणार आहे.या शिवाय दि ८ मार्च रोजी दुपारी कुस्त्यांची दंगल होणार आहे.