Ticker

6/recent/ticker-posts

महिला दिना निमित्त"कार्यरत महिलांचे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व वृक्ष फाउंडेशन तर्फे सन्मानपत्र देऊन गौरव


प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर 

उल्हासनगर  : महानगर पालिका महिला व बालकल्याण विभाग व वृक्ष फाउंडेशन तर्फे समाजाप्रती  योगदानातून न्याय, सत्य व सुकर्म प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत महिलांचे कर्तृत्व सर्व महिलांना प्रेरणादायी, ऊर्जादायी ठरावे म्हणून "महिला दिना निमित्त" सन्मानपत्र देऊन 8 मार्च रोजी सकाळी बोटक्लब गार्डन जवळ, उल्हासनगर 3 येथे गौरव करण्यात आला,

सदर कार्यक्रमात उल्हासनगर महानगर पालिका उपायुक्त डॉ सुभाष जाधव, उमनपा सचिव प्राजक्ता कुलकर्णी, पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत, आरोग्य विभाग प्रमुख मनीष हिवरे, एकनाथ पवार, सर्व शिक्षा अभियान समन्वयक संगीता लहाने, पुर्व महापौर राजश्री चौधरी, पुर्व नगरसेविका अंजली साळवे, शुभांगी बहनवाल व रेखा ठाकुर, कडोंमपा स्वछता ब्रेंड एम्बेसेडर रुपिंदर मुरजानी, कल्याण येथील समाजसेविका राणी कपोते व किन्नर अस्मिता टीम सदस्या यांचे उपस्थितित नवरत्न नारी शक्ति सन्मान उपक्रम म्हणुन डॉ तृप्ति रोकडे, लेखिका प्रिया वछानी, एसएसटी कॉलेज च्या डॉ खुशबु पुरस्वानी, किन्नर अस्मिता अध्यक्षा निता केणे, समाजसेविका जयश्री रगडे, लेखिका व लिम्का बुक इंडिया बुक रेकॉर्ड विनर  निवारोज़िन  राजकुमार, शिक्षण क्षेत्रातिल नावाज़लेल्या रेखा ठाकुर, महामाया असंगठित कामगार संघटना अध्यक्ष मिरा सपकाळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

समाजातील आरोग्यकर्मी, स्वछता दूत महिला, आशा वर्कर, रेटपिकर्स महिला व अन्य क्षेत्रातील शिक्षिका, डॉक्टर, नर्सेस व समाजसेविका यांचा सत्कार करण्यात आला, उल्हासनगर शहरात कार्यरत सामाजिक संस्था दशमेश पिता युवा सिख लबाना संघटन, सोहम फाउंडेशन, केसरी मित्र मंडळ, नवपंख फाउंडेशन व सखी सामाजिक संस्थाच्या महिलांना ही सन्मानित करण्यात आले,

शाहिर शीतल भंडारे व आकाश पवार यानी स्त्री उद्बोधनपर गीत गायले तर एसएसटी कॉलेज च्या विद्यार्थीयानी पथनाट्य सादर केले.

महिलांच्या आरोग्याची दक्षता घेत सदर दिनी उल्हासनगर महानगर पालिका तर्फे स्तनकेंसर आजारासाठी प्रबोधन करण्यात आले व वातानुकूलित वैनिटी व्हेन उपलब्घ करवून विनामूल्य तपास करण्याची सोय केली