Ticker

6/recent/ticker-posts

करिअर कट्याच्या राज्यस्तरीय समितीमध्ये प्रा.भगवान गावित यांची निवड

 


प्रतिनिधी प्रशांत सोनवणे

भोर.दि.०९  सुरगाणा तालुक्यातील वडपाडा सु.या गावातील कै..केशव गंगाराम गावित यांचा मुलगा प्रा.भगवान केशव गावित हे सद्या पुणे येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. आपल्या आदिवासी संस्कृतीशी नाळ जोडलेल्या प्रा.भगवान गावित यांचे पदवी (बी.ए.) आणि पदव्यूत्तर शिक्षण (एम.लिब.),ग्रंथालय शास्त्र  शिक्षण नाशिक येथे झाले असून  यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ग्रंथालय शास्त्रामध्ये, नेट (सहाय्यक प्राध्यापक) परीक्षा पास केली असून,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. आपले ग्रंथपालाचे कार्य करता असतांना त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये आपली यशस्वी वाटचाल सुरु केली आहे. 

आदिवासी समाजाचा एक साधारण मनुष्य पुण्यासारख्या स्पर्धेच्या शहरात आपल्या आदिवासी समाजाचा तसेच आपल्या सुरगाणा तालुक्याचे नाव उंचावत आहे हि एक सुरगाणा तालुक्याच्या दृष्टीने, गावाच्या दृष्टीने आणि त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय अतिशय महत्वाची बाब लागेल. आपले कार्य मनापासून करीत असतांना त्यांनी आदिवासी समाज, शिक्षण, आजूबाजूची परिस्थिती यावर बरेचसे लेखन वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले आहे.तसेच महाविद्यालयात  येणाऱ्या NAAC समितीसाठी त्यांची NAAC समन्वयक तसेच पुणे जिल्हा आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन पुणे जिल्हा यांच्या कार्यकारणीमध्ये (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष) अशा विविध कामांचा अनुभव त्यांना आहे.

अशातच महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभर करियर कट्टा हा उपक्रम राबविला आज आहे सन २०२२-२३ साली त्यांना सदर उपक्रमामध्ये चांगले काम केल्याबद्दल उत्कृष्ट तालुका समन्वयक (पुणे जिल्हा) म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक राज्याचे माजी साखर आयुक्त मा.डॉ.शेखर गायकवाड आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष मा.यशवंत शितोळे यांचे शुभहस्ते देण्यात आले. अशीच पुढे वाटचाल सुरु असतांना नुकताच त्यांना पुणे जिल्हा करिअर कट्टा (ग्रामीण समन्वयक) पदी नियुक्ती मिळाली आहे तसेच करिअर कट्याच्या राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समितीमध्ये समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे.वडिलांचे छत्र हरपले असतांनाही आपली वाटचाल प्रा.भगवान गावित यांनी चालू ठेवली आहे त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.