Ticker

6/recent/ticker-posts

समृद्धी महामार्गावरील फरदापूर (मेहकर) टोल नाक्यावर रात्री पासून कोणालाच टोल नाही


शेख बाबा लोणार प्रतिनिधी 

मेहकर जिल्हा बुलढाणा येथून मोठी बातमी अशी की समृद्धी महामार्गावरील फरदापूर (मेहकर) टोलनाका रात्रीपासून फ्री झाला आहे. मागील दोन ते तीन महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे.त्यामुळे टोल यंत्रणा हातळण्यासाठी कोणीही नसल्याने वाहने टोलनाक्यावरून विना टोलच जात आहे.

समृद्धी महामार्गाच्या मेहकर टोलनाक्यावर 3 शिफ्ट मध्ये 45 ते 50 कर्मचारी काम करतात. परंतु टोल वसूल करणाऱ्या कंपनीने मागील दोन ते तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतनच दिले नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी रात्रीपासून काम बंद केले आहे.