प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर शहरात महापालिकेने ठीक- ठिकाणी रस्ते खोदले आहेत.खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तेव्हा आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी कॅम्प क्रमांक -5 येथील भाटिया चौक परिसरात खोदलेल्या रस्त्यावर बसून आंदोलन केलंय.रात्री 11:30 च्या सुमारास ठेकेदरांकडून रस्त्याचं खोदकाम सुरु असतांना हे आंदोलन केलंय.
दोन्ही बाजूने रस्ते खोदून ठेवलेत.खोदलेल्या रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांच आरोग्य धोक्यात आलंय.महापालिका आणि ठेकेदार रस्ते दुरुस्ती करत नसल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन केलंय.रात्री उशिरा पोलिसांनी आंदोलन कर्त्यांशी समजूत घालत हे आंदोलन थांबलंय.मात्र यावेळी आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.





Social Plugin