Ticker

6/recent/ticker-posts

अखेर येवलेकरांना पिण्यासाठी मिळाले पाणी



अर्जुन घोडेराव(ग्रामीण प्रतिनिधी) येवला

साठवण तलावात दाखल झाले पालखेडचे आवर्तन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाचा तळ दिसू लागल्याने पाण्याचा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र पालखेड पाटबंधारे डावा कालवा विभागाचे पिण्यासाठीचे आवर्तन सुरू होऊन पाणी तलावात दाखल झाल्याने येवलेकरांनी निःस्वास सोडला आहे. येवला शहराला पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक दोन साठवण तलाव हा कोरडा पडला होता. 

त्यामुळे शहरात मोठा पाणी प्रश्न निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा देखील ठप्प झाला होता. अखेर शुक्रवारी पालखेड डाव्या कालव्याद्वारे येवल्यातील साठवण तलावामध्ये पाणी दाखल झाले असल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून लवकरच शहरातील विविध भागात पाणीपुरवठा हा सुरळीत होणार आहे. येवला साठवण तलावात पाणी दाखल झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.