रोहा/रायगड प्रकाश बागुल
चणेरा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळा व मुख्याध्यापक शिवाजी जोंधळे यांचा सेवागौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्यासमितीचे अध्यक्ष , विभाग प्रमुख ,आजीव सेवक डॉ. श्रीराम साळुंखे, अर्थ सहसचिव प्राचार्य सिताराम गवळी, रायगड विभाग प्रमुख प्राचार्य प्रकाश हाके, प्राचार्य बी. जे. दुधाळे, प्राचार्य ए. टी. साकोरे, पुणे विभागीय सदस्य रामशेठ साकोरे, आजीव सेवक जी. जे बोराटे, पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे, रायगड विभाग निरीक्षक संजय महाजन, एस. एस पाटील, एस. आर बेडगे, रायगड विभागातील प्राचार्य व मुख्याध्यापक , पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य ,विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर ,स्थानिक सल्लागार समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
शिक्षणमहर्षी डॉ बापुजी साळुंखे यांनी महाराष्ट्रात व कर्नाटक राज्यात शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवली. त्यांनी दिलेल्या आचारसंहितेनुसार विद्यादानाचे काम ज्ञानसंकुलात चालू आहे.हजारो विद्यार्थी शिक्षण संस्थेत शिकुन आज उच्च पदावर कार्यरत आहेत. ही संस्थेसाठी गौरवाची बाब आहे. असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगीतले.
तसेच मुख्याध्यापक शिवाजी जोंधळे यांच्याविषयी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगीतले की लहानपणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर या संस्थेत सेवा सुरु केली.म्हसळा,सासवड,केंदूर,वडगाव रासई, गुळसुंदे,चणेरे (रोहा) येथे प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य केले. सध्या रायगड विभाग विद्यासमिती सचिव व चणेरे येथे मुख्याध्यापक पदावर ते कार्यरत आहेत.त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले,वक्तशीरपणा,कर्तव्याप्रती बांधिलकी, स्पष्टवक्तेपणा, समयसूचकता,प्रामाणिकपणा,सचोटी असे त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत.शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या आदर्श कामाची दखल घेतली गेली ही आपणा सर्वांसाठीच भूषणावह बाब आहे.आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांचा केलेला सन्मान ही त्यांच्या अथक परिश्रमाची पावतीच आहे. विद्यालयामध्ये ही अनेक विद्यार्थी विकासासाठी आवश्यक असणारे कार्य त्यांनी केले आहे. त्यांना पुढील आयुष्य सुखी समाधानाचे जावो अशीही सदिच्छा व्यक्त केली. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शाळेत आवश्यक असलेल्या बाबींसाठी वस्तू स्वरूपात देणगी दिल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक यांनी आभार मानले .पंचक्रोशीतील ग्रामस्थ,शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी, विद्यार्थी , कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin