ना दिवस ना रात्र आता फक्त चारा संकलन हे एकच लक्ष... चार्यासाठी खटाव तालुक्यात शेतकरी वर्गाची धडपड...
रात्रीच्या वेळी चारा संकलनासाठी सुरू असलेली धडपड
प्रकाश राजेघाटगे
खटाव तालुक्याच्या पूर्व भागात सद्या दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली असून या भागात जातिवंत जनावरे व पशुधन मोठ्या प्रमाणावर असल्याने ह्या पशुधन संवर्धनासाठी सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे चारा होय ह्या
वर्षभरासाठी लागणार वाळक्या चार्याची साठवणूक करण्यासाठी सद्या शेतकरी वर्गाची व पशुधन व्यवसायिक यांची धडपड सुरू असून ना दिवस ना रात्र आता चारा संकलन हेच लक्ष ही भावना ठेवून मिळेल त्या ठिकाणाहून चारा संकलन करण्यासाठी तालुक्यातील पुर्व भागातील शेतकरी वर्गाची व पशुधन पालक व्यावसायिकांची धडपड सुरू आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की चालू वर्षी तालुक्याच्या पूर्व भागात म्हणजे घाटमाथ्या पासून पूर्वेकडे असणारी गावे - औंध, वरूड, सिद्धेश्वर कुरोली, नागाचे कुमठे, नायकाची वाडी, वाकेश्वर, वडूज, मांडवे, तडवळे, हिंगणे, कातर खटाव, एनकूळ, खातवळ, मायणी, निमसोड, या भागात पाऊस काळ म्हणावा असा न झाल्याने व जो काही थोडा फार झाला तोही उशिरा झाल्यामुळे चालु वर्षी रब्बी हंगामातील ज्वारी, मका, या बहुउपयोगी पिकांचा पेरा कमी प्रमाणात झाला. त्यामुळे आपसुकच जनावरांसाठी पुरवठ्याचे खाद्य म्हणून व साठवणुकीचा चारा म्हणून वापरला जाणार्या ज्वारीच्या वैरणीच्या ( कडबा ) उत्पादनात घट झाल्याचे चित्र सध्या पाहवयास मिळत असून, काही भागात उरमोडी कालवा आवर्तनाचे पाणी पुरवठा योजनांचे कँनाल व पोट पाट आहेत पण या कँनालमध्ये जे पाणी मागील एक दोन महिन्यांपूर्वी यायला हवे होते. ते न आल्याने या भागातील ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाल्याचे शेतकरी व उत्पादन वर्गामधून बोले जात आहे. सद्या ज्वारी काढणीची सुगी चालू असल्याने हा चारा गोळा करण्यासाठी पशुधन पालक व शेतकरी वर्गाची धडपड सुरू आहे.उत्पादन घटल्याने सद्या सिंगल कट्टी कडब्याचे दर तीन हजार रुपये शेकडा पासून पुढे कडब्याच्या प्रतिनुसार असून, डबल कट्टी कडबा पसतीशे ते चार हजार शेकड्या पासून पुढे आहेत. तरी या भागात जातिवंत पशुधन व दुग्ध व्यावसायिक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
तरी सद्या ह्या भागात चार्याची मोठी समस्या भेडसावत असून पशुधन वाचविण्यासाठी व वर्षभर पुरेल असा चारा साठवून ठेवण्यासाठी या भागातील पशुधन व दुग्धव्यवसाय करणार्या व्यवसायांची चारा साठवूनीसाठी व चारा संकलन करण्यासाठी दिवस रात्र धडपड चालू असल्याचे चित्र सध्या तालुक्याच्या भागात मिळत आहे.
मजुर कमतरता , ज्वारी काढणीस लागणार वाढता खर्च याचाही ज्वारी उत्पादकतेला मोठा फटका . - सद्या शेती कामांसाठी मजुर वर्ग मिळत नसल्याने व ज्वारी काढणी, काटणी, मळणी, पेंढ्या बांधणी, वाहतूक,असा सरासरी खर्च व व्यापक कष्ट असणारे ज्वारी हे पिक असून यातून हेवे तेवढं उत्पादन होत नसल्याने सद्या या भागात ज्वारीच्या उत्पादनात क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.





Social Plugin