Ticker

6/recent/ticker-posts

उमरखेड शहरात गोकुळ नगर व गणेश नगर परिसरात तरुण मोटारसायकल स्वाराचा धुमाकूळ


बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

    उमरखेड शहरातील गोकुळ नगर तसेच गणेश नगर या परिसरात काही नवतरुण युवक व मुले मोटारसायकलचे सायलेन्सर काढून जोरजोराने आवाज करून मोटरसायकली भरधाव वेगाने धूम स्टाईलने चालवत आहेत. त्यामुळे रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांचा तसेच रस्त्याने ये जा करणारे नागरिक, वयोवृध्द ज्येष्ठ नागरिक यांचे अपघात होऊन जिवीत हानी होण्याची दाट शक्यता  निर्माण झाली आहे. 

    त्यामुळे उमरखेड पोलिसांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक  असल्याची नागरिकांची मागणी आहे.  या अनुषंगाने ॲड संजय जाधव उमरखेड महाराष्ट्र ग्रामीण न्यूज शी बोलताना परिसरातील जनतेकडून एका मुलाचे नाव आळणे असून त्याचा भाऊ स्वयंपाक काम करतो असे समजले आहे अशी माहिती दिली. तेव्हा उमरखेड पोलिसांनी या बाबीची तात्काळ दखल घेऊन नवतरुण युवक व मुले यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.