कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी
मंठा : सालबादा प्रमाणे याही वर्षी ह.भ. प. सेवाधारी पौळ बाबा यांच्या आशीर्वादाने भव्य आणि दिव्य अशा अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन गेवराई येथे दि. 27 मार्च ते 3 एप्रिल 2024 दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह तथा संगीतमय श्रीमद्भगवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने गेल्या 30 वर्षी पासुन हा सप्ताह चालु आहे. या वर्षी या सप्ताहाचे 31 वर्षे आहे या सात दिवसाच्या नियोजना मध्ये दररोज सकाळी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, दुपारी संगितमय भागवत कथा, सायं काळी हरीपाठ व किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी श्रीमद्भगवत कथेचे प्रवक्ते ह.भ.प. मिलींद महाराज गोंदीकर हे आहेत. अत्यंत चांगल्या पध्दतीने ते भागवत कथेचे निरोपन करत आहेत. तसेच दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या किर्तनाचा लाभ भाविक घेत आहेत. या सप्ताहात विविध अभंगावर किर्तने होत आहेत.
दररोज होत असलेल्या किर्तना मध्ये अनुक्रमे ह.भ.प. अमृतानुभव कंठ भुषण विलास महाराज बागल, ह.भ.प.माऊली महाराज सालगावकर,ह.भ.प. रामायणचार्य निवृत्त महाराज लकडे, ह.भ.प. अनंत विभुषित ब्रम्हनीश्वर आचार्य 1008 स्वामी चैतन्य पुरीज महाराज नीळकंठेश्वर महाराज ह.भ.प. अशोक महाराज आळंदीकर, ह.भ.प. भजनसम्राट किशोर महाराज दिवटे, ह.भ.प. रामायनाचार्य दत्ता महाराज आनंदे, ह.भ.प. सतिष महाराज जाधव बोररांजणी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात भाविक श्रवणाचा लाभ घेत आहेत. मोठ्या प्रमाणात तरूणांनी सहभाग घेतला आहे. या सप्ताहा मुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत धार्मिक कार्यक्रमा मुळे शांतता, सलोखा निर्माण होतो व गावात आनंदाचे वातावरण या सप्ताहा मुळे निर्माण झाले. भाविक या सप्ताहात किर्तनाचा श्रवणाचा लाभ घेत आहेत.





Social Plugin