ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील नागरीकांचे मोबाईल फोन हरवण्याचे प्रमाण वाढल्याने त्याबाबत मा. पोलीस आयुक्त साो, ठाणे शहर व इतर वरिष्ठांनी हरविलेली मालमत्ता (मोबाईल फोन) शोधुन ती संबधीत नागरीकांना परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाकडून https://ceir.gov.in या वेबसाईटच्या आधारे नागरीकांचे हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळवुन त्याबाबत तांत्रिक तपास करून एकूण २१,५०,०००/- रूपये किमतीचे एकूण ५० मोबाईल फोन शोधुन काढून, हस्तगत करण्यात आले असून ते संबंधित नागरीकांना खात्रीकरून परत करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री. आशुतोष डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री शिवराज पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, श्री इंद्रजित कार्ले, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, श्री. शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील मपोनि/वनिता पाटील, सपोनि/श्रीकृष्ण गोरे, सपोनि/भुषण कापडणीस, सपोनि/सुनिल तारमळे, पोउनि / विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, सपोउनि/कल्याण ढोकणे, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/संदिप भोसले, पोहवा/संजय राठोड, पोहवा/गणेश गुरसाळी, मपोहवा/शितल पावसकर, मपोशि/मयुरी भोसले, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, चापोना/भगवान हिवरे यांनी केली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयअंतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबीवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील रहिवाश्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन बाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणे देवुन





Social Plugin