उल्हासनगरात धावणार ई बसेस
प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर
: उल्हासनगर महापालिकेच्या विविध योजनेंतर्गत शहरात महापालिकेच्या परिवहन ई सेवा आणि सिंधू भवनाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले. शहाडमध्ये बस डेपो होणार केंद्र शासनाच्या वतीने उल्हासनगरच्या परिवहन सेवेसाठी १०० बसेस देण्यात येणार असून सध्या चीम बसेस मंजूर झाल्या आहेत. या बसेस सोमवारपासून शहरात धावणार आहेत.
उल्हासनगरातील सपना गार्डन जवळ पालिकेच्या जागेवरील सिंधू भवनाची निर्मिती पालिकेच्या खर्चातून करण्यात आली आहे. या भवनासाठी चार कोटी ६९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे मंत्री रवींद्र बव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, मनपा आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, नगररचनाकार ललित खोब्रागडे, मनपा सचिव प्राजक्ता कुलकर्णी, मनपा पीआरओ छाया डांगळे, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, नाना बागुल, नरेंद्र कुमारी ठाकूर, अरुण अतान पंचम कलानी, भाजपा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासमवेत पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे महणाले की उल्हासनगरच्या विकासासाठी बुडीसीआरपीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून शहरवासीयांना मालकी हक्क देण्याचे काम शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin