. नितीन बंड परतूर (प्रतिनिधी)
परतूर शहरातील जागृत वटेश्वर महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा महोत्सव निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी भाविकांकडून अतिशय उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. यावेळी जागृत वटेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त रात्री १२:०० वाजता नागरिकांच्या उपस्थितीत आरती करून, शिव-पार्वती चा विवाह संपन्न कऱण्यात आला व रात्रभर कीर्तन,भजन करण्यात आले असे पुजारी रामभाऊ कांबळे गुरुजी यांनी सांगितले. तसेच परिसरातील नागरिकांच्या लोकसहभागातून देणगीच्या माध्यमातून भक्तांसाठी महाप्रसाद तयार करून वाटप करण्यात आले. जागृत वटेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची आज मोठ्या संख्येने गर्दी होती.
त्याचप्रमाणे विविध धार्मिक उपक्रमांनी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. मंदिराला फुले, पुष्पहार व लाईटिंगने सजविण्यात आले. महाशिवरात्री निमित्त भक्तांची मोठी रांग पाहावयास मिळत होती. अशा प्रकारे शहरामध्ये महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व महाप्रसाचा कार्यक्रम उस्फुर्तपणे पार पडला.





Social Plugin