प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
मध्यवर्ती रुग्णालयात दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना शौचास होणारी गैरसोय लक्षात घेऊन महिला दिनानिमित्त तीन शौचालयांचे उद्घाटन भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय गुप्ता, जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, भाजप नेते नीरजा मिश्रा, लकी नाथानी, फूलचंद यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांना सुविधा देण्याच्या उद्देशाने संजय गुप्ता यांनी हे शौचालय बांधले आहे. महिलांना रुग्णालयाबाहेर आरामात बसता यावे यासाठी याच आवारात उद्यानही बनविण्यात आले आहे. त्याचबरोबर महिलांना त्यांच्या बाळांना दूध पाजण्यासाठी केबिनही बनवण्यात आल्या होत्या, मात्र स्वच्छतागृहां अभावी महिलांची अडचण होती, ती आज दूर करून दिली. ONBV फाउंडेशनने रूग्णांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात मोफत भोजनाची व्यवस्था केली असून, त्याचा लाभ दररोज 250 लोक घेत आहेत.





Social Plugin