संतोष अटकर@ग्रामीण प्रतिनिधी
अकोला तालुक्यातील उगवा येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज बिज उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त गावातून दिंडीची मोठी मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक ही जगतगुरु संत तुकाराम महाराज मठ येथून सुरुवात झाली.आणी संपूर्न गावातून टाळ मृदंगाच्या गजरात भजनात संपूर्ण गावातून वारकरी पाऊली खेळत दंग झाले होते.गावात ठिकठिकाणी चहा फराळाची व्यवस्था केलेली दिसत होती. आणि दिंडीचे स्वागत व जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .या मध्ये संपूर्ण गावात वातावरण आनंदमय व भक्तिमय झाले होते.यामधे संपूर्ण गावातील युवा प्रतिष्ठित आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत दिंडी मिरवणूक ही जगतगुरु संत तुकाराम महाराज मठ येथे महाआरती करून विराम झाली.





Social Plugin