संजय भरदुक मंपीर प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यात १४४ कलम लागू . लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने १६मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असून प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला देखील सुरूवात होणार आहे या साठी कुठे ही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारींनी संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.काय आहेत कलम १४४ चे नियम?
(१)धार्मिक भावना दुखावणारे, समाजकंटक गट संघर्ष भडकावणारी कोणत्याही कॄती किंवा वक्तवे केल्यास कारवाई(२) अफवा पसरविणे ,सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणार्यावर कडक नजर असणार.,(३) पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक मेळावे.कार्यक्रमाच्या आयोजनास बंदी (४) नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हात सणाच्या काळात विनापरवाना मिरवणूक, अवैध शस्त्रे, शक्ती प्रदर्शन, प्रचारादरम्यान गर्दी जमाव, तसेच९एप्रिल रोजी गुढीपाडवा,११एप्रिल रोजी रमजान ईद,१४एप्रिल डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती,१७एप्रिल रोजी रामनवमी जन्मोत्सव, २३एप्रिल हनुमान जन्मोत्सव,सण येत आहेत व २६एप्रिल वाशिम जिल्हात मतदानाचा हक्क बजावण्याचा दिवस या दिवशी मतदान होणार आहे. या निमित्ताने जिल्हाभरात कलम १४४(अ)फौज.प्र.सं.१९७३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी लागू केले आहे.





Social Plugin