कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक : जिल्हाभरातील आश्रमशाळांमध्ये लवकरच सिकलसेल चाचणी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी रविवारी सांगितले. आदिवासी व्यवहार मंत्रालयांतर्गत ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ट्रिफेड) तर्फे नाशिक येथे आदिवासी कारागीर एम्पॅनलमेंट मेळा (TAeM) आयोजित करण्यात आला.
महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या सभेत पवार बोलत होते. सिकलसेल ॲनिमिया हा बहुतांशी आदिवासींमध्ये आढळून येतो आणि त्यामुळे जिल्हा रुग्णालयात मोफत तपासण्या केल्या जात आहेत. आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. आदिवासी विकास विभाग, भारतीय आदिवासी सहकारी विपणन संघ आणि राज्य सरकारचा आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी विकास महामंडळ इत्यादी आदिवासी लोकांच्या विकासासाठी काम करतात.
.png)




Social Plugin