Ticker

6/recent/ticker-posts

कोणार्क नगर (आडगाव) परिसरात विजेचा लपंडाव.


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - काल शुक्रवार दिवसभर कोणार्क नगर परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता. सध्या उन्हाची तीव्रता वाढली अजून वर्षभर बाजूला असलेली कूलर , एसी, पंखे  इत्यादि उपकरणे सुरू झाली असून विजेचा वापर वाढला आहे. 

त्यामुळे कल दिवसभर कोणार्क नगर, आडगाव परिसर व नाशिक शहरातील इतर उपनगरे या ठिकाणी वीज अगदी दहा दहा मिनिटांनी जात - येत होती. व्यापारी, खासगी आस्थापना, बँक अधिकारी हैराण आहे. शुक्रवारी रात्री साधारण एक तास वीज गायब होती.आधीच उष्णता वाढल्याने गरम होत असताना, त्यात रात्री अचानक वीज गेल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते.