Ticker

6/recent/ticker-posts

सलग नऊ दिवसांपासून सिटीलिंक वाहकांचा सुरु असलेला संप अखेर मिटला.



कीर्तीराज घुगे प्रतिनिधी

थकीत वेतनासह इतर मागण्यांकरिता ९ दिवसांपासून सुरु असलेला सिटीलिंक वाहकांचा मिटला. या संपामुळे सिटीलिंक प्रशासनाचे तब्बल १ कोटी ८० लाखांचे नूकसान झाले. संप मिटवण्यात अपयश येत असल्याने प्रशासन हतबल झाले होते. सिटीलिंक प्रशासन, ठेकेदार, कंपनीचे प्रतिनिधी आणि वाहकांसोबत  झालेल्या बैठकीत आश्वासन देउन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यानंतर वाहकांनी सांप मागे घेतला असून आजपासून रस्त्यावर  सिटीलिंक बसेस धावणार आहे.

सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. या बैठकीत एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत कंपनी ठेकेदार यांनी वाहकांच्या काही मागण्या मान्य केल्या तर उर्वरित ज्या मागण्या तात्काळ पूर्ण करणे शक्य नाही. अशा मागण्या टप्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील. असे आश्वासन दिल्याने अखेर हा संप मागे घेण्याचा निर्णय वाहकांनी घेतला आहे. १४ मार्च पासून पुकारलेला संप हा आतापर्यंतचा सर्वात मोठा म्हणजे सलग नऊ दिवस हा संप सुरु होता. यात सिटीलिंक प्रशासनाचे मोठे नूकसान झाले.