संजय भरदुक मंपीर प्रतिनिधी
कॄषी विज्ञान केंद्र करडा व एग्रीकल्चर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया आणि एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी अब्लिकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे तसेच नॅशनल स्किल काॅरपोरेशन कॄषी मंत्रालय भारत सरकार द्वारा वर्मी कंपोस्ट प्रोड्यूसर वर्कशॉप कारंजा लाड येथील श्री गुरुदेव सेवाश्रम शांतीनगर येथे पार पडले.यावेळी अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र करडाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री सुनील भाऊ देशमुख साहेब तथा डॉ रविन्द्र काळे सर व एग प्रोफेशनल अक्षयकुमार गिरी तसेच मास्टर फार्मर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी रविंन्द्र गायकवाड हे सर्व यावेळी उपस्थित होते.कॄषी विज्ञान केंद्र करडाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी गांडूळ खत निर्मिती तसेच गांडुळांचे जीवनक्रम मार्केटिंग, गांडूळ खताचा नैसर्गिक शेती मध्ये वापर शेत बांधावरती गांडूळ खत निर्मिती, वर्मी वॉश महत्त्व आधी इतर विषयावर तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले तसेच मास्टर फार्मर रविंन्द्र गायकवाड यांनी प्रकल्प उभारणी ते विक्री उभारणी करतेवेळी लागणारे कौशल्य, गांडूळाची निगा देखरेख ठेवण्यासाठी व्यवस्थापन, गांडूळ यांच्या अवस्था जाती, छोटे प्रकल्प उभारणी बँक लोन माहिती, उत्कृष्ट टाॢयकोडर्मायुक्त क्वालिटीचे गांडूळ खत निर्मितीचे तंत्रज्ञान, मशीन चा वापर, हार्वेस्टिंग प्रक्रिया, पॅकिंग ते विक्री सर्व विषयांची माहिती उपस्थित युवक व युवतींना प्रशिक्षण दिले तसेच गट निर्मिती व डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन चे महत्व आधी विषयावर प्रकाश टाकण्यात आला. या प्रशिक्षणाकरिता कारंजा, मंगरूळपीर,मानोरा येथील कृषी विस्तार कार्यकर्त्या व प्रगतीशील शेतकरी, गांडूळ खत उत्पादक शेतकरी, युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान कॄषी सखी यांनी घेतलेले नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षणांचे मॅनेज इन्स्टिट्यूट हैद्राबाद तर्फे प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. नैसर्गिक शेती करिता शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेतकरी बचत गट तयार करून नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सहभाग व कॄषी तंत्रज्ञान प्रकल्प यंत्रणा आत्मा वाशिम मध्ये गटांची नोंदणी आधी विषयावर चर्चा करण्यात आली.असे कॄषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी यांनी कळविले.





Social Plugin