Ticker

6/recent/ticker-posts

उल्हासनगर पाच दुर्गा पाढा येथे वर्षानुवर्षांची एक गाव एक होळीची परंपरा कायम

प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर 

  काळ झपाट्याने बदलत आहे. त्यानुसार सण साजरे करण्याच्या पध्दती, चालीरीती संस्कृतीही लोप पावत असताना दिसून येत आहे.  मात्र उल्हासनगर पाच दुर्गा पाढा जुने अंबरनाथ गाव  येथे पुर्वजांपासून सुरु असलेली एक गाव एक होळीची प्रथा आजही कायम असून सर्व गावकरी एकत्र येवून लाकडे गोळा करुन उत्साहात होळी सण साजरा करतात. यंदा गावातील होळी पेटवियाचा मान गावातील ज्येष्ठ नागरिकाला दिला जातो तो कोळी असो की पाटील यंदाचा मान सुदाम सोयेकर आणि मोहन पाटील यांना मिळाला.

 दुर्गा पाढात विविध धार्मिक कार्यक्रम एकत्रित येऊन साजरे केले जातात हे गावकर्‍यांचे विशेष म्हणजे. एक गाव एक होळी याप्रमाणे सण साजरा केला. सर्व गावकरी सकाळी गावाच्या मध्यभागी असलेल्या शिवसेना शाखा चौकात एकत्र येतात. याठिकाणी शेणाच्या गौर्‍या होळीसाठी जाळण्यासाठी लागणारे साहित्य बाम्बु गोळा करून चौकात आणतात.एक गाव एक होळी परंपरेप्रमाणे ही होळी रचण्याची म्हणजे तयार करण्यार्‍या गावातील लोकांचीही परंपरा आहे.

 यावेळी प्रधान पाटील, सुदाम सोयेकर,मोहन पाटील,राजा पाटील, कार्यकर्ते,  बाळ गोपाल मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.