Ticker

6/recent/ticker-posts

होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक पंचवटीसह मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव इत्यादि भागात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोवऱ्यांची आकर्षक रचना करून, होळीवर अनेकविध रंगांची उधळण केली होती. काही ठिकाणी होळीला साड्या गुंडाळण्यात येऊन पुष्पहारांनी सजविण्यात आले होते.

होळी भोवती रांगोळी काढून तिची शास्त्रोक्त पूजा करून होळी वाद्यांच्या गजरात पेटविण्यात आल्या. नाशिक पंचवटी येथील रामकुंडावर आदिवासी जीव रक्षक दल, व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने मानाची होळी करण्यात आली होती. त्यासाठी जवळपास ११ हजार गोवऱ्या वापरण्यात आल्या. सरदार चौक, गणेशवाडी,  तपोवन, जुना मखमलाबाद नाका, पाथरवट लेन, नांदूर, मानूर, मखमलाबाद, आडगाव, म्हसरूळ, कोणार्क नगर, व नाशकातील अनेक उपनगरात  ठीक ठिकाणी होळी करण्यात आल्या. 

होळीसाठी गोवऱ्या आणणे, होळीच्या जागेची स्वच्छता करून सडा रांगोळी करून  मध्यभागी ऊस लावून त्याच्याभोवती गोवऱ्या रचण्याचे काम दिवसभर सुरू होते. होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या जमा करण्याचे काम सकाळपासून करण्यात येत होते. होळीसाठी  यंदा गोवऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.