Ticker

6/recent/ticker-posts

किरण ताई गिर्हे यांचा अमान येथे सत्कार

 


अनिल जाधव :मालेगाव प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील ग्राम अमानी येथे  वाशिम येथील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ किरण ताई गिर्हे.यांचा सत्कार करण्यात आला.अमानी येथील अकोला सहकारी बोर्डाचे संचालक अनिल जाधव यांच्या निवास स्थानी  आज दिनांक 13 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश सदस्या तथा  नवनिर्वाचित  वाशिम जिल्हा अध्यक्ष सौ किरण ताई यांनी  सदिच्छ भेट दिलीअसता अमानी च्या माजी जिल्हा परिषद सदस्या तथा कैकाडी महासंघाच्या विदर्भ महिला आघाडी प्रमुख .सौ उषाताई अनिल जाधव .यांनी शाल श्रीफळ देऊनकिरण ताईंचा सत्कार केला याप्रसंगी समाधान गिरे तसेच माझी उपसरपंच अनिल जाधव यांची उपस्थिती लाभली होती.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनीच महिलांचा सत्कार,सन्मान केला असल्याने या वेळी गिर्हे ताईने जाधव ताईचे आभार मानले...