सागर सोहनी  ग्रामीण प्रतिनिधी

आटपाडी पंचायत समितीतील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तांत्रिक सहाय्यक अधिकारी म्हणून श्री सूर्यकांत जाधव काम करत असलेले अधिकारी प्रथमेश कन्स्ट्रक्शन कंपनी चे स्वतः मालक व ठेकेदार बनुन तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कामे स्वतः च करत आहेत अनेक ठिकाणी रस्ता मुरुमीकरण करणे,पेव्हींग ब्लॉक बसविणे व अन्य इतर कामे केलेली आहेत परंतु केलेली कामे ही अर्धवट व हलक्या दर्जाची आहेत आणि त्यांची बिले मात्र अदा केलेली आहेत त्याचबरोबर स्टँप हा पुढच्या तारखेचा जोडलेला असून काही स्टँपवर तारीख दिसून येत नाही तसेच GST बिलांवर GST नंबर नमूद केलेला नाही व त्याच्या तारखासुद्धा दिसत नाहीत.

        सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील श्री अशोक रामचंद्र जुगदर (माहिती अधिकार कार्यकर्ते ) यांनी माहितीच्या अधिकाराखाली आटपाडी पंचायत समितीतील केलेल्या कामाची माहिती मागविली असता हा मोठा प्रकार उघडकीस आला .या सर्व प्रकाराकडे गट विकास अधिकारी श्री मनोज भोसले यांनी दुर्लक्ष केले आहे असे दिसून येते आहे