Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळा केशव शिवणी सिंदखेड राजा तालुक्यात प्रथम



गंगाराम उबाळे  प्रतिनिधी  

महाराष्ट्र शासनाच्या अभिनव कल्पनेतून राबविल्या गेलेल्या माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केशव शिवणी ने मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

01जानेवारी रोजी या अभियानाची सुरुवात झाली असता माननीय गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री गावडे साहेब याच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय देशमुख सर शेख अहमद ,सुभाष आंधळे, संतोष डिघोळे,किशोर दंदे ,बाबासाहेब विघ्ने,राजेश चाटे या सर्व शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप उपाध्यक्ष बाबासाहेब ससाने सरपंच विकास आंधळे आणि समस्त गावकऱ्याच्या मदतीने लोक वर्गणीतून आवश्यक भौतिक सुविधा, शालेय रंगरंगोटी, गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि इतर निकष पूर्ण करण्यासाठी संपूर्ण 45 दिवस अहोरात्र मेहनत घेतली आणि शाळेचा कायापालट केला आणि केंद्र स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत झालेल्या सर्व मूल्यांकनांमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केशव शिवनी या शाळेने तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला यामुळे आज दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद बुलढाणा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल जी नरवाडे  साहेब यांच्या हस्ते व शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय खरात साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक मा.आकाळ साहेब शिक्षण अधिकारी योजना  वैशाली ठग मॅडम आणि मा. गटशिक्षणाधिकारी माननीय गावडे साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केशव शिवनी च्या सर्व टीमचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यामुळे परिसरात सर्व स्तरातून जिल्हा परिषद केशव शिवनी शाळेच्या सर्व टीमचे कौतुक करण्यात येत आहे