Ticker

6/recent/ticker-posts

जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेसचे परतूर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने जल्लोषात स्वागत, परतूरकरांसाठी सुवर्ण दिवस

नितीन  बंड प्रतिनिधी

जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेसचे परतूर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने गुरूवार 14 मार्च 2024 रोजी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी  परतूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील बी. मंत्री, सखाराम कुलकर्णी, अर्जून पाडेवार, नरेश कांबळे यांनी रेल्वे इंजिन लोको पायलट, रेल्वे स्टेशन प्रबंधक अमरदीप, गार्ड, तिकीट निरीक्षक यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. आजचा दिवस परतूरकरांसाठी सुवर्ण दिवस आहे अशी प्रतिक्रिया डॉ. मंत्री यांनी दिली व सर्व नागरिकांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले.

यावेळी परतूर रेल्वे संघर्ष समितीचे गणेश अग्रवाल, एस. एस. पाठक, डॉ सुरूशे, उमेश देशपांडे, अमोल अग्रवाल, अभिजित जोशी, सौरभ बगडीया, राजेश खरात, ताराचंद सकलेचा, शाम लोमटे, दत्ता खालापुरे, वाणिज्य पर्यवेक्षक संजीव गाडगे, बंडू कुलकर्णी, शुभम वटाणे, अश्विन दायमा, सुमित मोर, पवन शर्मा, अमित मोर, रामजी उमप, प्रशांत डोम, राहुल साठे, रवी मुंदडा, राजू साठे, मुकेश केजडीवाल, दिनेश साठे, सुनील कांबळे, विक्रम बासनवाळ, रोहीत मुंदडा, गुणवंत मोर, आनंद कोटेचा व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.