Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस झोनल अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागातील मतदारसंघात सुविधा पुरवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी .. एस डी ओ - प्रा संजय खडसे


राहुल डोंगरदिवे (मेरा बु प्रतिनिधी)

लोकसभा निवडणूक २०२४ सिंदखेडराजा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांची आढावा बैठक 

 पंचायत समिती सभागृह सिंदखेडराजा येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्व नोडल अधिकारी, झोनल अधिकारी, पोलीस अधिकारी,SST, VST, FST पथकातील सर्व कर्मचारी यांची मा. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

SST पथकाकरिता आयोगाकडून सी व्हिजिल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे या पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी या व्हिजल अँप चे सर्वसाधारण नागरिकांनी केलेल्या तक्रारीची तात्काळ नोंद घ्यावी आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना खडसे यांनी दिल्या.FST पथकाने प्राप्त झालेल्या तक्रारींची तक्रार स्थळी जाऊन चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करण्याची सूचना सुद्धा साहेबांनी दिल्या आहेत. SST पथक 27 मार्च 2024 पासून कार्यान्वित होणार आहे तरी या पथकातील सर्व अधिकाऱ्यांनी / कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या.सर्व झोनल अधिकाऱ्यांनी सर्व मतदार केंद्राची पाहणी करून संवेदनशील मतदार केंद्राबाबत अहवाल तयार करून तो सादर करायच्या सूचना मा. खडसे यांनी दिल्या आहेत.

पोलीस झोनल अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागातील मतदारसंघांना सुरक्षा पुरवण्यासाठी ची योग्य ती कार्यवाही करावी याबद्दल  मार्गदर्शन केले.मा. गटविकास अधिकारी वेणीकर यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात काही मार्गदर्शक सूचना सर्व कर्मचाऱ्यांना सांगितल्या, तसेच लोकसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्याचे आवाहन केले..

 आजच्या सभेला मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम मॅडम, मा. गटविकास अधिकारी सिंदखेड राजा श्रीकृष्ण वेणीकर सर, मा. गट विकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश महोर , मा. नायब तहसीलदार सिंदखेडराजा मनोज सातव , मा. नायब तहसीलदार देऊळगांव राजा अस्मा मुजावर मॅडम, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंदखेडराजा शेळके उपस्थित होते.