बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ] खटाव तालुक्यातील नागनाथवाडी विकास सेवा सोसायटीने सभासदांच्या हिताला प्राधान्य देत पारदर्शक काटकसरीचा आणि नियोजनबद्ध कारभार केला आहे सोसायटी आर्थिकदृष्ट्या फायद्यात असून परंपरेनुसार याहीवर्षी सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुलबाबा फडतरे व चेअरमन शेखर फडतरे यांनी सांगितले
संस्थेचे 2025-26 या आर्थिक वर्षाची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यावेळी मार्केट कमिटीचे संचालक राहुल फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच संस्थेचे चेअरमन श्री. शेखर फडतरे,व्हा. चेअरमन नामदेव शिरतोडे संचालक अर्जुन फडतरे,प्रकाश घाडगे,कृष्णात खापे,बाजीराव फडतरे सौ कान्होपात्रा फडतरे,श्रीमती शकुंतला जगताप,श्री संजय गुरव, शत्रुघ्न जगताप,अशोक गुरव सरपंच स्वप्निल तांबे,उपसरपंच निकिता फडतरे,सदस्य शिवाजी फडतरे,विकास घाडगे,मोहन तांबे ग्रामस्थ सभासद शेतकरी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली,
या सभेस जिल्हा बँकेचे अधीक्षक श्री धैर्यशील फडतरे व विकास अधिकारी मुकुंद लावंड यांनी मार्गदर्शन केले धनाजी यादव यांनी आढावा ताळेबंदाचे अंदाजपत्रक वाचन केले अध्यक्षीय भाषणात श्री शेखर फडतरे यांनी आतापर्यंतच्या यशस्वी वाटचाली सोबत लाभांश वाटपाची परंपरा कायम राखत याही वर्षी 15 टक्के लाभांश जाहीर करत नागनाथवाडी सोसायटी तालुक्यात अग्रगण्य व ऑडिट वर्ग "अ" संस्था असल्याचे नमूद केले तसेच यावर्षीही संस्थापातळी व बँकपातळीवर शंभर टक्के वसुली झाल्याबद्दल संचालक,शेतकरी सभासदांचे अभिनंदन केले. मा.सरपंच शिवाजी गुरव यांनी उपस्थित्यांचे आमचे आभार व्यक्त केले.





Social Plugin