बुधसह खटाव तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद बाब ; आपल्यातील असामान्य प्रतिभेने अल्पावधीत देशाच्या राष्ट्रीय संघामध्ये मिळवले स्थान
प्रकाश राजेघाटगे
खटाव तालुक्यातील बुध येथील सुपुत्र अभिषेक धनंजय सूर्यवंशी याची देशाच्या फुटबॉल राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना तसेच कोणीही गॉडफादर नसताना बुध सारख्या खेड्यातील एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगा फुटबॉल खेळाकडे आकर्षित होतो व आपल्यातील असामान्य प्रतिभेने अल्पावधीत देशाच्या राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळवतो. ही बुधसह खटाव तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
तो पुणे येथील टाटा मोटर्समधील सेवक धनंजय सूर्यवंशी यांचा सुपुत्र आहे. ज्या खेळामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून गोवा, कलकता तसेच नॉर्थ ईस्ट भागाचे वर्चस्व आहे. अशा खेळात राष्ट्रीय संघात स्थान मिळवणे ही मोठी अचिव्हमेंट आहे. यामध्ये त्याच्या आई व वडीलांची मेहनत व पाठिंबा महत्त्वाचा आहेच, त्यापेक्षा अधिक त्याचा भाऊ अतुल याने केलेला त्याग व त्याचे मार्गदर्शन मौल्यवान आहे. इथेपर्यंतचा अभिषेकचा प्रवास थक्क करणारा आहे. खडतर मेहनत, मानसिक संतुलन, खेळातील सातत्य, फिटनेस यातील काहीच सोपे नाहीतरीही आसामान्य प्रतिभेच्या जोरावर तालुका, विभाग राष्ट्रीय स्तरावर पोहोचणे त्यापेक्षा ही फुटबॉल पंढरीतील मोहन बगान सारख्या तगड्या क्लबमध्ये स्थान मिळविणे हे सर्व अचंबित करणारे आहे. मोहन बगान मधील फक्त दोघांचीच निवड राष्ट्रीय संघात झाली आहे ही गोष्टच त्याच्या कर्तृत्वाची साक्ष पटवाते, नजीकच्या काळात
होणाऱ्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या निवडीबद्दल त्याचे गृहविभागाचे उपसचिव वैभव राजेघाटगे , अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे , सरपंच सौ . सुजाता बोराटे , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व बुधचे उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , माजी सरपंच बाळासाहेब इंगळे , माजी सरपंच अशोक पुरे , व बुध ग्रामस्थांनी अभिनंदन केले .
अल्पावधीत अभिषेकची गरुड भरारी
अंतरराष्ट्रीय स्तरावर जर्सी क्र. १६ मोहन बागान सुपर जाइंटस् कोलकता अशी ओळख असलेला २२ वर्षीय अभिषेक हा भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा नवा चेहरा आहे. २०२१ मध्ये मालदीव येथे झालेल्या आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी ए.टी.के. मोहन बागानच्या संघात निवड होणारा हा पहिलाच फुटबॉलपडू आहे. तो मिडफिल्डर पोजीशनला खेळतो. मोहन बागान क्लबसाठी त्याने तीन वर्षाचा करार केला आहे. या करारापोटी त्याला प्रतीवर्ष २० लाख रुपये मिळणार आहेत. अभिषेक हा मोहन बागान सारख्या अग्रगन्य फुटबॉल क्लबशी करार केलाला महाराष्ट्रातील पहिलाच फुटबॉलपट्टू ठरला आहे. त्याचे शालेय शिक्षण जे.एन. पेटीट स्कुलमध्ये झाले आहे. सुरुवातीला त्याला क्रिकेट खेळाची आवड होती. मात्र त्याच्यातील आक्रमकता, स्टॅमिना, तंदुरुस्ती हे बघून प्रशिक्षक नंदू अंगीरवार यांनी त्यास फुटबॉलकडे वळण्याचा सल्ला दिला. तो सल्ला शिरोधार्य माणून अल्पावधीत फुटबॉलमध्ये अभिषेकने गरुडझेप घेतली आहे.





Social Plugin