शेख बाबा लोणार प्रतिनिधी
देऊळगांव राजा येथील महामना लाॅन्स येथे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्याला शिवसेना नेते खा.प्रतापरावजी जाधव व माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्रजी शिंगणे आणि माजी मंत्री आ.डॉ.संजयजी कुटे यांनी संबोधित केले.आगामी काळात एकदिलाने काम करूया महायुतीचा विजय खेचून आणूया असा विश्वास महायुतीच्या प्रमुख मान्यवर मंडळी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. व तसेच महायुतीच्या अन्य प्रमुख मान्यवर मंडळी यांनी मार्गदर्शन केले.
सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे विचार आणि कार्यप्रणाली तथा तत्त्वांशी प्रामाणिक राहून आगामी लोकसभा निवडणुकीत ताकदीने काम करण्याच्या सूचना महायुतीच्या नेते यांनी करत कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे नक्कीच मोठ्या यशात रूपांतर होईल अशी ग्वाही महायुतीच्या नेते मंडळी यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी खासदार मा.सुखदेवराव काळे,माजी आमदार डॉ.शंशिकांत खेडेकर, माजी आमदार मा.तोतारामजी कांयदे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.गणेश मान्टे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.नाझेर काझी,शिवसेना जिल्हाप्रमुख मा.बळीराम मापारी,भाजपचे नेते मा.विनोद वाघ,भाजपा विस्तारक मा.मोहनजी शर्मा,राष्ट्रवादीचे मा.रियाजखाॅ पठाण,कवाडे गटाचे मा.विजयजी गवई,राष्ट्रवादीचे मा.शंतनुजी बोंद्रे,मा.दिलीप झोटे तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील महायुती चे प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.





Social Plugin