Ticker

6/recent/ticker-posts

सुसरे येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला उस्फूर्त प्रतिसाद


पाथर्डी प्रतिनिधी:

पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पांढरवस्ती,गावठाण या दोन बुथवर वेगवेगळे आरोग्य कर्मचारी,आशा सेविका कार्यरत होत्या. पोलिओ लसीकरण मोहीम सकाळी 8 ते 5 या वेळेत राबविण्यात आली होती.या मोहिमेत 0 ते 5 वयोगटातील 198 मुलांना लसीकरण करण्यात आले. पोलिओ आजाराच्या उच्चाटनासाठी गावकऱ्यांनी यावेळी सहभाग नोंदवला.यावेळी लेक लाडकी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.सर्व पालकांना या योजनेविषयी माहिती दिली. लसीकरण मोहीम पार पाडण्यासाठी आरोग्य सेविका जिजाबाई मिसाळ, उमा उदागे, संगिता गुगळे, मंगल कंठाळी, वैशाली कंठाळी, संगिता तेलोरे यांनी परिश्रम घेतले.