Ticker

6/recent/ticker-posts

पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये टेलरिंग साठी महिलांची निवड,


ग्रामीण प्रतिनिधी, राजू लहाने

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी तालुक्यातील अनेक गावातून पुरुष व महिलांनी ऑनलाइन अर्ज केले असून त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील महिलांची ट्रेनिंग साठी पहिली बॅच निवड करण्यात आली आहे त्यामध्ये शिरपूर ब्राह्मणवाडा तिन्ही राजुरा करंजी महिला व पुरुष 45 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली करंजी मधून पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये अशा राजू लहाने ज्योती गणेश लहाने ज्योती विनोद लहान गोदावरी विजय पळसकर कल्पना संदीप पळसकर या पाच महिलाची निवड झाली असून अनेक फॉर्म भरलेल्या महिला प्रतीक्षेत आहेत

 या योजनेमध्ये एकूण 18 प्रकारच्या ट्रेड आहेत त्यामध्ये टेलर, राज मिस्त्री, बार्बर, कारपेंटर या चार ट्रेडला चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्व ट्रेनिंग स्थानिक प्रधानमंत्री कौशल्य केंद्र वाशिम येथील संस्थेचे हेड अमोल कुलकर्णी सर यांच्या निघ राणी होत आहे तसेच संस्थेचे कर्मचारी वाजिद सर आदिल सर पूजा मॅडम भगत सर सोनल मॅडम भगत मॅडम हे अतिशय चांगल्या प्रकारे योजनेच्या लाभार्थ्यांना ट्रेनिंग देत आहे भगत मॅडम यांनी संपूर्ण बॅचला चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच महाराष्ट्र हेड अमोल कुलकर्णी हे या योजनेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या लाभार्थ्यांना चांगल्या प्रकारचे जेवण मिळावे तसेच चांगले प्रशिक्षण या संस्थेमध्ये मिळावे यासाठी लक्ष देत आहे तसेच वाशिम जिल्ह्यातील कारागिरांनी या पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान अमोल सर यांनी केले आहे