Ticker

6/recent/ticker-posts

होळीच्या रंगाने भरली गुणवत्तेची घागर .ठुणे केंद्रात सुरू जाहला शिष्यवृत्ती जागर


- प्रतिनिधी शहापूर रविंद्र धारवणे .

     जिल्हा परिषद शाळा नारायणगाव येथे कलायतन केंद्र ठुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ करिता इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षा २०२४ गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी शिवानी पवार मॅडम यांच्या प्रेरणेने अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.ठाणे जिल्ह्याचे राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करण्याचे गोड स्वप्न ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि नेतृत्वात पूर्ण झाले ते ठुणे केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मा. डॉ. विलास वेखंडे सर यांच्या संकल्पनेतून आजची विद्यार्थी निवड चाचणी परीक्षा २०२४ सन्मा. केंद्रप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व यशस्वी आयोजनात संपन्न झाली.

    या परीक्षेत ठुणे केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेत ठाणे जिल्ह्यातील या पहिल्या उपक्रमास सुंदर प्रतिसाद देत एकूण ६३ विद्यार्थी सहभागी झाले होते. या २०० गुणांच्या परीक्षेत तब्ब्ल ५३विद्यार्थी पात्र ठरले आहेत.ही परीक्षा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे २०२४/२०२५च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी निश्चितचं मार्गदर्शक ठरेलं असे परीक्षे दरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह आणि गुणांकन पाहून वाटले.यावेळी यशस्वी पहिल्या २५ विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. या बक्षीस रुपी भेटीस  केंद्रप्रमुख यांचे सौजन्य लाभले. या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन ठुणे केंद्राचे शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक भगवान वरकुटे सर व योगेश रोठे सर यांनी आपल्या बहारदार शैलीत केले.

   यावेळी शाळा व्यवस्थापन समिती नारायणगाव चे अध्यक्ष  भगवान दादा चौधरी यांनी मनोगतात परीक्षा आयोजक डॉ.  विलास वेखंडे सर यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ठुणे केंद्राचा शिष्यवृत्ती, नवोदय पॅटर्न पुढे यशस्वी करण्यासाठी आपण सखोल अभ्यास करायला हवा व येणाऱ्या उन्हाळी सुट्टीत मामाच्या, मावशी च्या गावाला न जाता आपलंच गाव कसे शिष्यवृत्तीमय करता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी प्रेरणादायी भावना मांडत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सकारात्मक विचार मांडले.

     आजच्या या परीक्षेसाठी नारायणगाव शाळेचे मुख्याध्यापक  दशरथ विशे सर, आष्टे शाळेचे  भगवान वरकुटे सर, चरिव शाळेचे  सुनील रिकामे सर, बेडीसगाव शाळेचे  यशवंत केदार सर, ठुणे शाळेच्या विजया केदार मॅडम, लवले शाळेच्या सुजाता पतंगराव मॅडम, मळेगाव शाळेच्या दर्शना रोठे मॅडम, आदिवली शाळेचे मारुती खाडे सर उपस्थित होते.