Ticker

6/recent/ticker-posts

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्र आज नाशकात


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्र आज नाशकात दाखल होणार आहे. दुपारी २ वाजता द्वारका येथे राहुल गांधी यांचे आगमन होणार आहे. शालिमार चौकात इंदिरा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहेत.

शालिमार येथे चौक सभा होणार आहे. त्यानंतर त्र्यंबकनाका मार्गे त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत. दरम्यान, सातपूर येथे कामगारांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मा व्हॅलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पालघर जिल्ह्यात जाणार आहे. 

राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.