Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी- सपोनी आशिष कांबळे

 


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 काही गावांमध्ये जातीय स्वरूपाचे किंवा सामाजिक राजकीय गटातटाचे प्रकार घडत असतील तर ते गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सोडवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी पोलिसांच्या मदतीची गरज लागल्यास आणि तर ते प्रश्न मिटत असतील तर पोलिसांचेआपणास सर्वतोपरी सहकार्य राहील असे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नी. आशिष कांबळे यांनी केले.

   वर्धनगड ता .खटाव येथे सामाजिक सलोखा या संदर्भामध्ये येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी सपोनी आशिष कांबळे बोलत होते. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले " अनेक गावामध्ये गैरसमजातून जातीय किंवा सामाजिक राजकीय तेढ निर्माण होते.आणि ती निर्माण होऊ नये, तसेच प्रत्येक गावागावांमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही व पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागू नये व अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी अशा प्रकारचे प्रश्न उद्भवल्यास प्रतिष्ठित लोकांच्या मदतीने ते प्रश्न गाव पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि गाव पातळीवर असे वाद मिटत असतील आणि त्यासाठी पोलिसांची मदत लागली तर निश्चितच सहकार्याची भूमिका आमची असेल, कोणावरही गुन्हे दाखल होऊ नयेत हीच पोलिसांची ही अपेक्षा असते, परंतु ज्या ठिकाणी कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे तिथे कारवाई करावीच लागेल, गावातील काही वादांच्यामुळे त्या वादांचे रूपांतर दुसऱ्या गावापर्यंत पोहोचत असेल तर आपण पोलीस स्टेशनची त्वरित संपर्क साधने गरजेचे आहे. असे सुचित करून ग्रामस्थांना सलोख्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच अर्जुन मोहिते यांनी आपलेही विचार व्यक्त केले. व उपस्थित सर्व पुसेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे आभार मानून अभिनंदन केले. यावेळी पोलीस स्टेशनचे अधिकारी व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तसेच गावातील विविध धर्माचे मान्यवर नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.