Ticker

6/recent/ticker-posts

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आशा दिन साजरा.


प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर 

उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आशा दिन साजरा करण्यात आलाये.सर्वसामान्य नागरिक व आरोग्य विभाग या दोघांमधील महत्वाचा दुवा असणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि  गटप्रवर्तक यांनी जनसामान्यांना दिलेल्या आरोग्यसेवेबद्दल त्यांचे कौतुक व्हावे आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने महापालिकेच्या सभागृहात आशा दिन उत्साहात साजरा करण्यात आलाये.

तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना प्रथम,द्वितीय तृतीय धनादेश स्वरूपात पारितोषिक देऊन सन्मानित केलंय.या कार्यक्रमाला महापालिका उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,आरोग्य विभागाच्या मोहनी धर्मा सह मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविकांनी सहभाग घेतला होता.