Ticker

6/recent/ticker-posts

नवीन वाढीव कर आकारणी थांबवून सर्व सामान्य जनतेस दिलासा द्यावा - प्रकाश दुधेवार शहर अध्यक्ष भाजपा



बाळासाहेब पवार प्रतिनिधी

उमरखेड नगर परिषदेकडून सन २०२४-२५ ते २०२७-२८ करीता प्रस्तावित वार्षिक कर मुल्यांकन सुचना (नोटीस) नागरीकांना देण्यात आली आहे. या वाढीव कराला स्थगिती देवून नागरीकांना पुर्वीप्रमाणेच कराची आकारणी करावी व सर्व सामान्य जनतेस दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी उमरखेड मंडल यांनी नगर परिषद मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. नगर परिषदेकडून वर्ष २०२४-२५ ते २०२७-२८ या वर्षाकरीता प्रस्तावित वार्षिक कर मूल्यांकन सुचना (नोटीस) नागरीकांना देण्यात आल्या आहेत. या नोटीसमध्ये वाढीव कर लावण्यात आला आहे. परंतु लोकांची वाढीव कर भरण्याची परिस्थिती नाही. 

कारण अगोदरच नागरीक कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे ग्रस्त झाले होते. त्यामध्ये टाळेबंदीनंतर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वाढती महागाई अशा परिस्थितीतून जनजीवन पुर्वपदावर येत आहे. यात भरीस भर म्हणून नगर परिषदेने नागरीकांना वाढीव कराच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या त्रासामध्ये भर पडली आहे. सदरची वाढीव कराची नोटीस ही अन्यायकारक असून, पुर्वीप्रमाणेच नागरीकांना कराची आकारणी करुन दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी उमरखेड मंडल यांनी केली आहे. त्यावेळी प्रकाश दुधेवार शहराध्यक्ष भाजपा उमरखेड मंडळ तसेच बाबाराव ईटकरे, गजानन जगताप, अतुल खंदारे, पवन मेंढे, लक्ष्मीकांत मैड, आनंदराव चिकने, विष्णू पवार, प्रदीप शेरे, संजय भंडारे, संतोष बोडके, ऍड. अस्मिता टाकनखारे (आढावे), सविता पाचकोरे हजर होते.