पाथर्डी प्रतिनिधी:- ज्ञानेश कंठाळी
भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे, त्यांच्यासारख्या जनाधार असलेल्या लोकनेत्यांवर पक्षात होत असलेला अन्याय पक्षाने दुर करावा यासाठी जलक्रांती अभियानाचे प्रवर्तक, माजी प्रदुषण आयुक्त व ओबीसी नेते दिलीपराव खेडकर यांनी मोहटा देवीला चांदीचा मुकुट अर्पण करील असा नवस केला होता.
त्यानंतर भाजपच्याने पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. खेडकर यांनी नवस बोलल्या प्रमाणे सुमारे दीड किलो चांदीचा सुबक कलाकुसर असलेला मुकुट मोहटादेवी चरणी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समवेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजीमंत्री शिवाजी कर्डिले, भाजपचे राज्य चिटणीस अरुण मुंडे, भालगावच्या लोकनियुक्त मा.सरपंच डाॅ. मनोरमा खेडकर, दिलीपराव खेडकर, जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव खेडकर, मुकुंद गर्जे आदी उपस्थित होते.





Social Plugin