कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
वाहकांना ६५ लाखांचे वेतन अदा करूनही आठव्या दिवशी गुरुवारी संपातून वाहकांनी माघार न घेतल्याने महापालिका प्रशासनासमोर मोठा पेच उद्भवला आहे. सलग आठ दिवसांपासून सिटीलिंक वाहकांचा संप सुरू असल्याने याचा फटका लाखो नाशिककरांना बसत असून, याप्रकरणी नागरिक संताप व्यक्त करत आहे.वाहकांनी आक्रम कपणा कायम ठेवत बोनसची मागणी करत प्रशासनाला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे करायचे तरी काय, अशी अवस्था प्रशासनाची झाली आहे.
रोज कामावर जाणारे चाकरमाने, शाळेतील विद्यार्थी यांना रोजच्या येण्या जाण्यासाठी इतर साधनांचा पर्याय घ्यावा लागत आहे. महापालिकेकडून नवीन ठेकेदाराची शोधण्याची प्रक्रिया सुरू असली तरी आचारसंहिता असल्याने अडचण निर्माण झाली आहे. संपाचा एक-एक दिवस लांबत चालल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. मॅक्स डिटेक्टिव्हज अण्ड सिक्युरिटीज या वाहक पुरवठादार कंपनीकडे नाशिक तपोवनातील जवळपास १५० बसेसचा ठेका आहे व ५०० वाहक या कंपनीच्या माध्यमातून कामाला आहे. डिसेंबरपासून वेतन थकवल्याने संतप्त अद्यापपर्यंत वाहकांनी संप मागे घेतलेला नाही.
.png)




Social Plugin