कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक शहरात व उप नगरात जागोजागी महानगरपालिके तर्फे गतिरोधक बसवण्यात आले आहेत, मात्र अशास्त्रीय गतिरोधक हे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यांवर शास्त्रीय दृष्टीनेच गतिरोधक असणे गरजेचे असताना, नाशिक महापालिकेसह रस्ता सुरक्षा समितीतील अधिकाऱ्यांनी गतिरोधक उभारले.
सर्वच नियम आणि निकष धाब्यावर बसवून हे गतिरोधक महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एखाद-दोन यंत्रणांना व लोकांना विश्वासात न घेताच बसवले आहेत. आता शहरात या गतिरोधकांबाबत वाहनधारकांकडून ओरड सुरू झाली आहे.
नव्याने तयार केलेल्या गतिरोधकांवर कुठल्याही प्रकारचे झेब्रा पट्टे रंगवलेले नाही. त्यामुळे वाहन धारकांना अचानक समोर आलेले गतिरोधक लांबून नीटसे दिसत नसल्याने, गतिरोधकच अपघाताचे कारण ठरत आहे. काही ठिकाणी खूप उंच आणि काही ठिकाणी छोटे गतिरोधक तयार केले आहेत.
.png)




Social Plugin