प्रतिनिधी दीपक गुरव चाळीसगाव
चाळीसगाव येथील रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर कै. भगवानदास अग्रवाल व कै. शामभाऊ अग्रवाल यांच्या स्मरणार्थ मंगळवार ९ एप्रिल रोजी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली आहे.
शहरातील घाटरोडवरील अॅग्लो उर्दू हायस्कुलच्या पटांगणावर दुपारी ३ ते ६ या वेळात रंगणाऱ्या या कुस्त्यांच्या दंगलीचे उदघाटन खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते होणार असून आखाडा पूजन चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग बोडचि चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष राजीव देशमुख असतील. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
यावेळी हिंद केसरी अभिजीत कटके, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, प्रविण देशमुख, धर्मा शिंदे, केवल भिंगर, हर्षल सदगीर, किरण भगत, अतुल पाटील, रोहीत पटेल, सिकं दर शेख, बाला रफिक, माऊली दमदाडे, सागर बिराजदार या मल्लांची उपस्थिती असणार आहे. तसेचराज्यासह देशभरातील नामवंत मल्ल या कुस्तीच्या दंगलीत सहभागी होणार आहेत.
कुस्तीप्रेमींनी या कुस्तीच्या दंगलीचा आनंद घ्यावा असे आवाहन रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अक्षय अग्रवाल, उपाध्यक्ष शेख गफूर पहिलवान, सेक्रेटरी रमेश जानराव, खजिनदार जुगलकिशोर अग्रवाल, कार्य. सदस्य राजेंद्र अग्रवाल, संजय अग्रवाल, सुशिल अग्रवाल, मयुर अग्रवाल, रवी अग्रवाल, प्रशील अग्रवाल, तन्मय अग्रवाल यांनी केले आहे.





Social Plugin