समाधान भुसारे ग्रामीण प्रतिनिधी
शाळांचे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शाळा सुटली तरी शाळेच्या आणि सोबत्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम रुंजी घालते. त्यामुळेच शाळा सुटली तरी सोबत्यांची साथ कायम असते. हे माजी विद्यार्थी एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींमध्ये रमून गेले होते. शाळेचे मंतरलेले दिवस आठवून पुन: प्रत्ययाचा आनंद प्रत्येक जण घेत होता. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच सध्या आपल्या आयुष्यात काय चालले आहे. हे एकमेकांना सांगताना गप्पा रंगत गेल्या.सर्व कार्यक्रमाचे नियोजन संपूर्ण बॅच 2002 यांनी केले होते.





Social Plugin