Ticker

6/recent/ticker-posts

भीमाशंकर सोसायटीकडे जाणारा डीपीरस्त्याचे काम मार्गी

नगरसेवक योगेश काळोखे यांच्या प्रयत्नांना यश

पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे 

दि ११ क्षेत्र देहू येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या येथील भीमा शंकर सोसायटी जवळून गायरानाकडे जाणारा व देहू आळंदी रस्त्यावरील युनिकेअर हॉस्पिटल ते बाह्यवळण रस्ता या दोन रस्त्यांना जोडणारा डीपी मंजूर रस्ता, बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राच्या भूसंपादना बाबत व दिव्यांग बांधवांना एका निवासी मिळकतीला घरपट्टी मध्ये ५० टक्के सूट देण्याबाबतचे ठराव श्री क्षेत्र देहू नगरपंचायतीच्या कार्यालयात आज (दि. ११ ) रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याने या भागात राहणाऱ्या रहिवाशांचा रस्त्याचा व पाण्याचा प्रश्नाबाबतचा वनवास लवकरच संपणार असल्याने या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

देहूगावातील भीमाशंकर सोसायटीकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून डिपी मध्ये मंजूर होता. मात्र हा रस्ता यासाठी नगरसेवक योगेश काळोखे यांनी देहू नगरपंचायतीकडे पाठपुरावा केला होता. त्याच प्रमाणे बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राच्या जवळील पंपीग हाऊसची जागा देखील भूसंपादन करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. युनिकेयर हॉस्पिटल ते भीमाशंकर सोसायटी मार्गे गायरान व युनिकेअर हॉस्पिटल ते मारुती काळोखे चौक ते परंडवाल चौक या बाह्यवळण रस्ता हा नियोजीत डीपी मध्ये २४ मीटर रुंदीचा होता.  मात्र यारस्त्यांचे रेखांकनामुळे या भागात राहणाऱ्या काही रहिवाशांची घरे बाधित होत होती. परिणामी या भागातील रहिवाशांना बेघर व्हावे लागले असते. याची दखल घेत नगरसेवक योगेश काळोखे यांनी काही दिवसांपुर्वी या रस्त्यांची रुंदी २४ मीटर ऐवजी १२ मीटर करावी व या रस्त्याचे रेखांकनात बदल करावा अशी लेखी मागणी केली होती. याच प्रमाणे या भागातील नागरिकांची ही हा रस्ता लवकरात लवकर व्हावा ही मागणी होती. नगरपंचायतीने रस्त्याचे रेखांकन बदलल्याने हा रस्ता मोकळ्या जागेतून जाणार असून रहिवाशांची घरे बाधित होणार नाही त्यामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच प्रमाणे नगरपंचायतीला देखील जागा संपादनासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागली असती ती देखील वाचणार असल्याची माहिती नगरसेवक योगेश काळोखे यांनी दिली. तसेच देहूगाव नगरपंचायत हद्दीत दिव्यांग बांधव देखील राहत असून या दिवंग बांधवांसाठी एका निवासी मिळकतीला घरपट्टीमध्ये 50 टक्के सूट देण्याबाबतचा विशेष ठराव देखील पारित करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पसरले आहे.

देहूची लोकसंख्यांदिवसे दिवस वाढत असून येथील पाणी पुरवठा योजना व जलशुध्दीकरण प्रकल्प कमी पडत आहे. यासाठी बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राचे विस्तारीकरण करण्यासाठी जागेची आवश्कता होती. या जलउपसा केंद्राच्या जवळ असलेली जागा खाजगी मालकीची अशल्याने या जागेचे भूसंपादन झाल्याशिवाय या योजनेचा विस्तार करणे शक्य नव्हते, त्यामुळे या जलउपसा केंद्राच्या पंपींग हाऊला लागुन असलेली खाजगी जागा संपादीत करण्या संदर्भात ठरावही या सभेत मंजूर करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात देहू पाणी पुरवठा योजनेला गती मिळणार असून या योजनेचा विस्तार होऊन देहूचा पाणी प्रश्न संपणार आहे. यावेळी नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष सुधीर काळोखे, गटनेता, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे व सर्व विभागांचे प्रशासन अधिकारी उपस्थित होते.