Ticker

6/recent/ticker-posts

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शकपणे पार पाडा - जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उपाययोजना  करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिले. भारतीय  निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करून येऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची प्रक्रिया शांततेत, निःपक्षपातीपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश नाशिक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिले. 

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निवडणुकीच्या विविध कामांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये निवडणूक कामकाजासाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते. 

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेच्या वातावरणात पाडण्यासाठी नियुक्त प्रत्येक नोडल कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात अधिकाऱ्याने भारत निवडणूक आयोजित या बैठकीस अपर आयोगाच्या निर्देशांची माहिती घ्यावी. त्याप्रमाणे नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. वेळोवेळी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घ्यावा. 

मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करून निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे. तसेच, गत निवडणुकीत आलेल्या अडचणी पुन्हा उदभवणार नाहीत, यासाठी दक्ष रहावे, असे त्यांनी सूचित केले.