Ticker

6/recent/ticker-posts

पाटण तालुक्यात मुनावळे प्रमाणे जल क्रीडा प्रकल्प होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 पाटण ( दिनकर वाईकर) 

सातारा जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात लोकाभिमुख प्रकल्प केले याचे मला समाधान आहे मुनावळे प्रमाणे पाटण तालुक्यात देखील जल क्रीडा प्रकल्प करतोय त्यासाठी आपण 70 कोटी रुपये मंजूर केले आहेत रेशीम प्रकल्प बांबू प्रकल्प जेजे प्रकल्प जावळीला केले तसेच आपल्याला पाटण तालुक्यात देखील करायचे आहे यासाठी निधीची कमतरता पडणार नाही याची चिंता करू नका असे मुख्यमंत्र्यांनी मोरगिरी येथे बोलताना आपल्या भाषणात सांगितले 

मोरगिरी ता पाटण येथे तालुक्यातील धोकावळे दरड ग्रस्त आंबेघर  हुंबरळि मिरगाव काहीर जिंतकरवाडी शीद्रुकवाडी या भूस्खलन बाधित गावांचे पुनर्वसन भूमिपूजन कार्यक्रम तसेच मल्हार पेठ पोलीस स्टेशन इमारत निवासस्थान पाटण पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचे निवासस्थान ऑनलाईन लोकार्पण याबरोबर तहसीलदार आणि प्रांत यांना स्कॉर्पिओ गाड्या वितरण शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी जितेंद्र जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यशराज देसाई रविराज देसाई प्रांताधिकारी सुनील गाडे तहसीलदार अनंत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले मी नगर विकास मंत्री असताना दरडग्रस्त गावांना भेट दिली त्यावेळी माझ्या लक्षात आले या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होणे गरजेचे आहे हे सरकार सर्वसामान्यांचे व सर्वसामान्यांच्या हिताचे लोकांसाठी कायदा नियम बाजूला ठेवून एमएमआरडीला तात्काळ निर्देश दिले पाटण तालुक्यातील दरग्रस्त गावकरी महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही त्यांना तात्काळ निधी मंजूर करा दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 160 कोटी रुपये मंजूर केले घटना घडली त्यावेळी तात्काळ पाच कोटी रुपये मंजूर करून दिले होते आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे जिथे जिथे आपत्ती ते पूर येतो संकट येते तेथे एकनाथ शिंदे पहिल्या नंबरला असतो त्या त्या वेळी आपण त्यांना मदत दिलेली आहे मग ते संकट कुठलेही आणि महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणचे असू दे शेवटी आपले हे सरकार लोकांसाठी व लोकांना मदत करण्यासाठी आहे

घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधणारा भेटणारा त्यांचे गारान ऐकून घेणारा मुख्यमंत्री आहे म्हणूनच थोडक्यात कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणात या राज्यात अनेक विकासाचे प्रकल्प आणले त्याबरोबर शेतकरी कष्टकरी कामगार या सगळ्यांना आपण न्याय दिला महिला सक्षमीकरणाचे धोरण  आपण जाहीर केले

महिलांना 50 टक्के सवलत एसटी प्रवासात दिली म्हणून तोट्यात चालणारी एसटी फायद्यात आली लेक लाडकी लखपती महिला बचत गटांना प्राधान्य देतोय शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये यात केंद्राचे सहा हजार रुपये वर्षाला 12 हजार रुपये शेतकरी कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला एक रुपयात पिक विमा शेतकऱ्यांच्या सुखदुखात उभे राहणारे हे सरकार आहे नजीकच्या काळात सातारा जिल्ह्यात अनेक प्रकल्प अनेक सुख सुविधा देण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे शिक्षण आरोग्य याबरोबर पर्यटनाला चालना रोजगारासाठी शहरात जाणाऱ्या तरुण नाला येथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यासाठी पर्यटन वाढीसाठी 426 कोटी रुपये जिल्ह्याला मंजूर केले आहेत यातून पर्यटनाला चालण्यात येण्याची काम केले आहे आमचे सरकार आल्यापासून झालेले कॅबिनेट मध्ये 500 च्या वर निर्णय घेतले म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मागच्या दीड वर्षात सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे व अमुलाग्र बदल घडवण्याचे काम आपण केले आहे